〉 मी भारताचा नागरिक आहे असे आपण अगदी सहज म्हणतो. पण आपण कितव्या क्रमांकाचे नागरिक आहोत याचा कधी विचार केलाय का? नाही ना?
〉 तर संविधाना नुसार विचार केला तर आपण म्हणजेच "कोणतीही सामान्य व्यक्ती" भारताचा २७ व्या क्रमांकावरील नागरीक असतो"
● आता हे कसे काय?
〉 तर संविधानातील तरतूदी नुसार पहिल्या २६ क्रमांकांवर भारतातील महत्त्वाच्या पदांवरील व्यक्ती भारतीय नागरिक असल्याचे म्हटले आहे.
〉 शाळेत असताना आपण पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाचे नागरिक राष्ट्रपती व उप - राष्ट्रपती असतात हे शिकलो आहे. मात्र त्यापुढे कोण याबाबत आपल्याला फारशी माहिती नसते.
» तर तिसऱ्या क्रमांकावर पंतप्रधान.
» देशाचा चौथ्या क्रमांकाचा नागरिक राज्यपाल 【स्वतःच्या संबंधित राज्यात】 आणि पाचव्या क्रमांकावर देशाचे माजी राष्ट्रपती असतात.
» याशिवाय सहाव्या क्रमांकापासून २६ व्या क्रमांकापर्यंत खालील व्यक्ती असतात
» देशाचे सरन्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष.
» केंद्रीय मंत्रीमंडळातील सदस्य आणि राज्यांचे मुख्यमंत्री, निती आयोगचे उपाध्यक्ष, माजी पंतप्रधान, राज्यसभा व लोकसभेचा विरोधी पक्षनेता.
» भारतातील मान्यताप्राप्त राजदूत, मुख्यमंत्री 【स्वत:च्या राज्याबाहेर】, राज्यपाल 【स्वत:च्या राज्याबाहेर】
» सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश.
» राज्यसभा उपाध्यक्ष, उपमुख्यमंत्री, लोकसभा उपसभापती,निती आयोगातील सदस्य,संरक्षण विभागाशी निगडीत इतर मंत्री.
» अॅटर्नी जनरल,मंत्रिमंडळ सचिव,उप-राज्यपाल
【केंद्रशासित प्रदेशांसह】
» तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख.
» असाधारण राजदूत व पूर्णाधिकार प्राप्त मंत्री.
» राज्यांचे चेअरमन आणि राज्य विधानसभेचे सभापती, हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश.
» राज्यांचे मंत्रिमंडळ सदस्य,केंद्रशासित राज्यांचे मुख्यमंत्री,दिल्लीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, केंद्रातील उपमंत्री.
» लेफ्टनंट जनरल आणि प्रमुख अधिकारी
» अल्प संख्याक आयोगाचे अध्यक्ष, अनुसूचित जाती - जमातीच्या राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष, हायकोर्ट मुख्य न्यायाधीश 【स्वत:च्या राज्या बाहेर】
» कॅबिनेट मंत्री 【स्वत:च्या राज्याबाहेर】,राज्यांच्या विधान सभेचे सभापती व अध्यक्ष 【स्वत:च्या राज्याबाहेर】,राज्यांच्या विधानसभेचे उपाध्यक्ष, राज्यांचे मंत्री.
» केंद्रशासित राज्यांचे मुख्य आयुक्त, केंद्रशासित राज्यांचे उपमंत्री तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभेचे उपाअध्यक्ष
» राज्यांच्या विधानसभांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष 【स्वत:च्या राज्याबाहेर】
» खासदार.
» राज्यांचे उपमुख्यमंत्री 【स्वत:च्या राज्याबाहेर】
» लष्कराचे कमांडर,व्हाइसचीफ,इतर महत्त्वाचे अधिकारी, राज्य सरकार मुख्य सचिव, अल्पसंख्याक आयागोचे आयुक्त,अनुसूचित जाती जमाती आयोग आयुक्त आणि अल्पसंख्याक आयोगातील सदस्य, राष्ट्रीय अनुसूचित जाती व राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्य.
» उप राज्यपालांच्या रँकशी समकक्ष अधिकारी.
» भारत सरकारचे अतिरिक्त सचिव.
» भारत सरकारचे संयुक्त सचिव, मेजर जनरल रँकशी समस्क रँकचे अधिकारी.
» सामान्य नागरिक 【आपण】





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!